नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायकोचे धक्कादायक कृत्य; आधी 4 महिन्याच्या बाळाला संपवल आणि मग…

पत्नीची धक्कादायक कारवाई, पती फिरायला घेऊन जात नाही;  प्रथम 4 महिन्यांच्या बाळाला पूर्ण केले आणि नंतर... title=

पालघरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आत्महत्या केली.

पालघर क्राईम न्यूज:

पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद विवाद होतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला पोहचतात की होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. नवरा फिरायला घेऊन जात नाही म्हणून बायको धक्कादायक कृत्य केले. यामुळे चार महिन्याच्या बाळाचा नाहक बळी गेला आहे.

पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मना धरून एका मातेने आपल्याच साडे चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीची गळा आवळून हत्या करत नंतर गळफास घेत स्वतःही आत्महत्या केल्याची हृदय हादरवणारी घटना पालघर मध्ये समोर आली आहे. पालघरच्या डहाणूतील सिसने येथे ही घटना घडली आहे.

मनीषा राजड (वय वर्ष 23) असे मृत महिलेचे नाव आहे. या मातेने आधी आपल्या साडेचार महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली . त्यानंतर तिने स्वतः आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.

मनीषाचे पती हे मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करत असून ते नेहमीच घराबाहेर असत . पाऊस सुरू झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, परवा पुन्हा आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्याचा राग मनात धरून मनीषाने हे धक्कादायक कृत्य केलं आहे . या प्रकरणात मयत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here