Sharad Pawar : मंगळसूत्राचे विधान मोदी तुम्हाला पंतप्रधान म्हणून शोभते का? पवारांचा थेट सवाल | Maharashtra Times


अहमदनगर : राष्ट्रवादीच्या प्रचार मेळाव्यातून शरद पवारांनी पीएम मोदींच्या लोकसभा प्रचाराचा समाचार घेतला. मोदी साहेबांचा प्रचार काही सांगण्याची गरज नाही पंतप्रधान म्हणून बसलेली व्यक्तीने देशाचा आणि देशातील सर्व घटकांचा विचार केला पाहिजे पण मोदींनी मात्र तसे केले नाही. प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो देशाचा असतो पण ते कर्तव्य निभावताना मोदी विसरले असे म्हणता येणार नाही त्यांनी मुद्दाम अशी विधाने केली आहेत, कारण त्यांची विचारधारा तशी आहे, अल्पसंख्यांकाचा भावनाचा विचार केला नाही त्यांचा प्रचारातून अनादर केला असे परखड मत पवारांनी मांडले.

मोदींनी एका भाषणादरम्यान सांगितले की ज्यांचा घरी मुले जास्त जन्माला येतात असा एक वर्ग आहे याचा अर्थ त्यांना मुस्लिम समाजाबद्दल बोलायचे होते आणि ते म्हणाले की त्यांच्या हातात सत्ता गेली की तुमच्या भगिनीचे मंगळसूत्र जाईल कधी असे घडले का? असे कधी देशात घडले नाही,पंतप्रधानांनी असे बोलणे याप्रकारची चर्चा करणे काही तारताम्य काही मर्यादा मोदींनी पाळली नाही अशी टीका पवारांनी केली.
maharashtra times“होय मी आत्मा, पण तुम्हाला सोडणार नाही” शरद पवारांचे ‘भटकती आत्मा’ टीकेवरुन मोदींना प्रत्युत्तर

राजकीय पक्ष किंवा नेत्यांवर टीका करताना काही मर्यादा आम्ही ठेवतो पण मोदींनी माझ्याबद्दल बोलताना भटकती आत्मा असा अपशब्द वापरला तसे त्यांचे “एकादृष्टीने खरंच आहे आत्मा आहे मी आणि तुम्हाला सोडणार नाही” असे थेट उत्तर पवारांनी दिले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्यांचा विस्तार केला, मराठी माणसाला पाठबळ दिले आणि शिवसेनेबद्दल बोलताना मोदी म्हणतात नकली बापाची संघटना असे हे बोलणे मोदींना शोभते का? यांचा अर्थ मोदींना तारतम्य राहिले नाही. सत्ता हातात येण्याची शक्यता मावळताना दिसली तर माणूस बेफाम होतो, तशीच मोदींची स्थिती झाली होती असे पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या पक्षाचा आज रौप्य महोत्सवी वर्धापन दिन नगरमध्ये साजरा करण्यात आला. पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या गटाचा हा पहिला वर्धापन दिन आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे पवारांसोबत हजर होते. तसेच नवनिर्वाचित आठही खासदारांचे सुद्धा पक्षाच्या वतीने आज जंगी स्वागत करण्यात आले.



Source link

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here