युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त

कीव्ह, वृत्तसंस्था : युद्ध सुरू असताना युक्रेनी लष्कराने रशियात घुसून त्यांचा एक सैन्य उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात रशियाचे नवीन आणि अत्याधुनिक सुखोई-57 हे लढाऊ विमान ड्रोनच्या मदतीने उडवून दिले आहे.

युक्रेनी सैन्याने हा हल्ला रशियाच्या अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केला आहे. हा तळ युद्धभूमीपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे. सुखाई-57 हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली विमान असून त्याचा वेग ताशी 2 हजार 130 किलोमीटर इतका आहे. हे लढाऊ विमान इतके शक्तिशाली आहे की त्याला नाटोकडून हत्यारा असे (फेलॉन) असे संबोधले जाते. सॅटेलाईटच्या माध्यमातून छायाचित्रे समोर आली असून सात जून रोजी सुखोई-57 हे विमान अस्त्राखान हवाई तळावर दिसत असून आठ जून रोजी त्याठिकाणी आग दिसत आहे.

युक्रेनचा हल्ला इतका भयानक होता की परिसरात केवळ अवशेषच दिसत होते. रशियाजवळ सुखोई-57 ची 32 विमाने आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी 2028 सुखोई-57 ची संख्या 76 वर नेण्याचा निर्धार केला आहे. अस्त्राखान शहरात युक्रेनचे तीन ड्रोन दाखल झाले होते. रशियाने हे ड्रोन पाडले होते, पण सुखोई-57 वर झालेल्या हल्ल्याबाबत रशियाकडून काही सांगण्यात आले नाही. 10 मे रोजी रशियाने खार्किव्हवरील हल्ले वाढवले होते. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडे त्यांनी दिलेली शस्त्रे रशियाविरोधात वापरण्याची परवानगी मागितली होती.

सीमेपासून हाकलण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाविरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली होती. पाश्चिमात्य देशांच्या शस्त्रांच्या मदतीने युक्रेन रशियाला सीमेपासून हाकलून लावत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनीही रशियाविरोधात युक्रेनला शक्तिशाली लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली होती.Source link

Related Posts

महिला पोलीस अधिकाऱ्याने सर केले Everest सर; अहमदनगर येथील महिला पोलीस अधिकारी द्वारका विश्वनाथ डोके यांनी Everest सर केले आहे

शिर्डी : नाव द्वारका विश्वनाथ डोके. वय 50 वर्षे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणारे आणि सध्या नाशिक येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी द्वारकेला “साद देति हिम…

Read more

Continue reading
नौदलाच्या ताफ्यात 6 अत्याधुनिक पाणबुड्यांचा समावेश असेल

स्पेनमध्ये होणार चाचणी : प्रकल्पात सहभागी भारतीय कंपन्या वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय नौदल स्पेनमध्ये 'प्रोजेक्ट 75 इंडिया (P75I)' अंतर्गत अत्याधुनिक उपकरणांची चाचणी घेईल. या चाचणीनंतर भारतीय नौदल आपल्या ताफ्यात 6…

Read more

Continue reading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

6000mAh बैटरी वाला नया यह Vivo 5G Smartphone 20 जून को होगा इंडिया में लॉन्च

6000mAh बैटरी वाला नया यह Vivo 5G Smartphone 20 जून को होगा इंडिया में लॉन्च

श्लोका मेहता किसी स्टाइल आइकन से कम नहीं, राधिका-अनंत के सेलिब्रेशन में ग्लैमरस डीवा दिखीं अंबानी बहू

श्लोका मेहता किसी स्टाइल आइकन से कम नहीं, राधिका-अनंत के सेलिब्रेशन में ग्लैमरस डीवा दिखीं अंबानी बहू

प्रियंका गांधी लड़ेंगी उपचुनाव, राहुल गांधी ने की पुष्टि, इस सीट से लड़ेंगी चुनाव

प्रियंका गांधी लड़ेंगी उपचुनाव, राहुल गांधी ने की पुष्टि, इस सीट से लड़ेंगी चुनाव

महिला पोलीस अधिकाऱ्याने सर केले Everest सर; अहमदनगर येथील महिला पोलीस अधिकारी द्वारका विश्वनाथ डोके यांनी Everest सर केले आहे

महिला पोलीस अधिकाऱ्याने सर केले Everest सर;  अहमदनगर येथील महिला पोलीस अधिकारी द्वारका विश्वनाथ डोके यांनी Everest सर केले आहे

CMF Phone (1) की भारतीय लॉन्च डेट आई सामने, जानें कब आ रहा है ये सस्ता और यूनिक फोन

CMF Phone (1) की भारतीय लॉन्च डेट आई सामने, जानें कब आ रहा है ये सस्ता और यूनिक फोन

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024

Indian Air Force Agniveervayu Bharti 2024